महाराष्ट्र
गडकरीचे स्वप्न सत्यात; महाराष्ट्रात धावू लागली उडती बस

नागपूर : केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचे उडत्या बसचे स्वप्न अखेर महाराष्ट्रात साकारले आहे. ‘गतीमान सरकार, कामगिरी दमदार’ या शब्दाचा प्रत्यय महाराष्ट्रातील जनतेला एका व्हायरल व्हिडिओमुळे आला आहे. गडचिरोली-अहेरी मार्गावर धावणाऱ्या एका बसचा हा व्हिडिओ असून ती उडती बस असल्याचे नेटकरी सांगत आहेत.

ही बस दुरुस्तीसाठी जात असून त्यामुळे एकही प्रवासी त्यामध्ये नसल्याचे काही जण सांगत आहेत. सुरक्षित प्रवासासाठी ओळखली जाणारी ‘एसटी’ची बससेवा आता सुरक्षित राहिली आहे का? असा प्रश्नही आता काहीजण विचारत आहेत. महाराष्ट्राबाहेरही अनेकदा जुन्या व अस्वच्छ बस जात असून त्यामुळे एसटीची व महाराष्ट्राची राज्याबाहेर प्रतिमा खराब होत नाही का, असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.












