महाराष्ट्र

अभिनेता संतोष जुवेकरच नेटकऱ्याला सडेतोड उत्तर

कलाकारांच्या लुक वरून नेटकरी बऱ्याचवेळा त्यांना ट्रोल करत असतात. मराठी अभिनेता संतोष जुवेकरच्या दाढी आणि मिशी मधील लुककडे त्याची ओळख म्हणून पाहिले जाते. पण नुकताच त्याने सोशल मीडियावर दाढी आणि मिशी काढलेला फोटो टाकला व त्याबरोबर बर्‍याच दिवसांन दाढी भादरालिया अशी कॅप्शन टाकली होती.

त्यावर अनेकांनी त्याला चांगल्या कमेंट दिल्या पण ट्रोल करताना एका नेटकऱ्यान चुकीची कमेंट केली. यावर या नेटकऱ्याला संतोष जुवेकर याने सडेतोड उत्तर देत त्याची बोलती बंद केली आहे. संतोष ने म्हटलं आहे की, मित्रा जे नाव टीका करण्यासाठी उच्चारलासना त्या नावात खूप मोठी ताकद आहे. पुरुष आणि आदिशक्ती स्त्री या दोघांचीही ताकत ज्याच्यात सामावली आहेना तो देवाचा आणि निसर्गाचा अविष्कार आहे हे नाव. आदर करतो मी त्याचा. तुही कर आणि खरा पुरुष हो भावा. संतोषने दिलेल्या या उत्तरात  त्याच्या विचारांची ताकद कळत आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये