महाराष्ट्र
नाशिकमध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; तिघे जखमी

नाशिक : उत्तमनगर येथील सर्वेश्वर महादेव चौकातील एका घरात चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोटानंतर संपूर्ण घराला आग लागली.
जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या स्फोटामुळे शेजारच्या घराच्या काचा फुटल्या असून समोरच्या भागातील दोन गाड्यांच्या काचा फुटून नुकसान झाले आहे.













