पुणे शहर

महिला डॉक्टरचा विनयभंग करणाऱ्यावर कडक कारवाई करा : दिपाली धुमाळ

जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये महिला सुरक्षा अधिकारी नेमा

पुणे : शिवाजीनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्यात यावी. तसेच या घटनेकडे दुर्लक्ष करून हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची ही चौकशी करण्यात यावी. अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

या संदर्भातील पत्र त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. नक्की जम्बो रुग्णालयात चाललय तरी काय हाच प्रश्न या प्रकारामुळे सर्वांना पडला आहे. या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे तेथे काम करणाऱ्या सहकारी डॉक्टारांनीच हा प्रकार केला आहे. याप्रकरणी एका २५ वर्षीय महिला डॉक्टरने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुमाळ यांनी म्हंटले आहे की,  काही दिवसांपुर्वी या रुग्णालयातून एक महिला गायब झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिस व नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतर  शनिवारी ती सापडली आहे. आणि आता महिला डॉक्टर चा विनयभंग झाल्याचा प्रकार त्यामुळे नेमकं कोविड सेंटरमध्ये चाललयं तरी काय अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला डॉक्टर व आरोपी डॉक्टर हे शिवाजीनगर येथील जम्बो कोविड रुग्णालयात काम करतात. दोन दिवसापुर्वी महिला डॉक्टर कर्तव्यावर असताना, त्यांच्याशी दोघा आरोपींनी अश्लिल वर्तन करत त्यांचा विनयभंग केला. या बाबत फिर्यादी डॉक्टर तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर शनिवारी दुपारी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये महिला सुरक्षा अधिकारी नेमण्यांत यावा जेणे करुन रुग्णाल्यातील सर्व डॉक्टर्स , नर्सेस व इतर महिला कर्मचारी  यांना सुरक्षितपणे काम करता येईल. तसेच मागील एक महिन्यापासून डॉक्टर महिलेसोबत हा प्रकार सुरू होता. त्यांनी वारंवार तेथील
प्रशासनाच्या निदर्शनास ही गोष्ट आणून देखील या बाबत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे समजते. तरी या संपुर्ण घटनेची सखोल चौकशी व्हावी व संबंधीत आरोपींवर  कडक कारवाई करण्यात यावी तसेच जे संबंधीत अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष व हलगर्जीपणा करत आहेत त्यांच्यावर सुध्दा योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये