पुणे शहर

पुणे शहरात युवक वर्ग मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणीपासून वंचित,युवकांनी मतदार नोंदणी करून लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे- दीपक मानकर

पुणे शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची बैठक व पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम संपन्न

पुणे : पुणे शहरातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी पासून वंचित आहे. अशा युवकांसाठी आपल्या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक महाविद्यालयात मतदार जन जागृती अभियान राबविण्यात यावे. लोकशाहीमध्ये युवकांची मोठी जवाबदारी आहे.असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी व्यक्त केले आहे.

पुणे शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची बैठक व पदाधिकारी नियुक्ती गुप्ते मंगल कार्यालय, नारायण पेठ येथे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी ते बोलत होते.

मानकर म्हणाले, सध्याच्या काळात वाढती व्यसनाधीनता हि मोठी समस्या सोडविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालय आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन पाठपुरावा केला पाहिजे. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्याला आपण निश्चित पने मदत करणार आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे.

यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष शुभम माताळे ,प्रदेश प्रतिनिधी नानासाहेब नलावडे, विद्यार्थी शहर कार्याध्यक्ष सुमित केदासे, विद्यार्थी शहर कार्याध्यक्ष परवेज शेख व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Img 20230717 wa0012281292712276676815194924
Img 20230511 wa0002282296555721650380460122

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये