पुणे शहर

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचे वाटप


नगरसेविका वृषाली चौधरी व चिदानंद प्रतिष्ठानचा उपक्रम

वारजे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचे वाटप भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेविका वृषाली दत्तात्रय चौधरी यांच्या माध्यमातून व चिदानंद प्रतिष्ठान वारजे यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमात प्रभाग क्रमांक ३१ येथील ७० रिक्षाचालकांना पार्टीशन पडदा व विमा, ७० गरीब वंचीत नागरिक, प्रभागातील छोटे व्यवसायिक व  पत्रकार यांचा या योजनेच्या माध्यमातून २ लाखांचा विमा काढण्यात आला आहे. यावेळी स्वेदगंगा, पी एम टी, शिवगंगा, आचार्य, गिरीश, गोपाळ कृष्ण सोसायटी व कॅनॉल रोड येथील परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसी टिव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी संघटन मंत्री रवी अनासपुरे, संघटन सरचिटणीस  राजेश पांडे, संभाजीभाग कार्यवाह सुधिर जवळेकर, कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष पुनीत जोशी, सरचिटणीस  विठ्ठल बराटे, माजी नगरसेवक शिवराम मेंगडे , किरण बारटक्के, सुनिल मारणे, प्रभाग प्रभारी कुलदीप साळवेकर, प्रभाग अध्यक्ष हेमंत बोरकर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रमेश चव्हाण, सुहास साठे,  वृत्तपत्र विक्रेता अध्यक्ष विजयजी पारगे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक राजेश बराटे, सुशिल मेंगडे , नगरसेविका वृषाली चौधरी व दत्ताञय चौधरी यांनी केले होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये