महाराष्ट्र

शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय किती वाजता देणार? कळवायला उशीर का?, ठाकरे गटाचे वकिल असीम सरोदेंचा सवाल, निकालाच्या दोनच शक्यता…

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज निकाल येणर आहे.  दुपारी चारनंतर हा निर्णय येणार आहे.  कुठल्या गटाचे आमदार अपात्र ठरणार, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष आहे.अपात्रतेबाबत काय निर्णय होणार? असा प्रश्न सर्वांना आहे मात्र आज निर्णय होणार का? असा प्रश्न मला पडतोय कारण अजूनही प्रकरणातील  वकील म्हणून मला किंवा इतर  वकिलांना  सचिव यांच्याकडून इमेल आलेली नाही की राहुल नार्वेकर  किती वाजता निर्णय जाहीर करणार? अशा आशयाची फेसबुक पोस्ट ठाकरे गटाचे  वकिल असीम सरोदे यांनी केली आहे. आज किती वाजता निर्णय जाहीर करणार?, हे कळवायला उशीर का? असा सवाल सरोदे यांनी केला आहे.

असिम सरोदे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल की, अपात्रतेबाबत काय निर्णय होणार? असा प्रश्न सर्वांना आहे मात्र आज निर्णय होणार का? असा प्रश्न मला पडतोय कारण अजूनही प्रकरणातील  वकील म्हणून मला किंवा इतर  वकिलांना Maharashtra Legislative Assembly सचिव यांच्याकडून इमेल आलेली नाही की राहुल नार्वेकर किती वाजता निर्णय जाहीर करणार?

Img 20240110 wa00016797133464190795551

निकालाच्या दोनच शक्यता

निकालाच्या शक्यतांवर बोलताना असीम सरोदे म्हणाले, अपात्रतेच्या बाबतीत निकालाच्या दोनच शक्यता आहेत. एक कायदेशीर आणि दुसरी बेकायदेशीर.तरीही प्राधान्यक्रमाने पहिली शक्यता आहे की बेकायदेशीर निर्णय येईल व एकनाथ शिंदेंसह सगळ्या आमदारांना पात्र ठरवले जाईल.दुसरी शक्यता कायद्याच्या चौकटीत बसणारी आहे ती म्हणजे शिंदेंसह सगळे अपात्र ठरतील.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे डोळे आजच्या निकालाकडे लागले आहेत. प्रचंड धक्कादायकरित्या घडलेल्या या सत्तानाट्याने महाराष्ट्राचा राजकीय पटच बदलून टाकला.  उद्धव ठाकरेंना चेकमेट करून शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र आता कोर्ट शिंदेंसोबत गेलेल्या १६ आमदारांना पात्र ठरवणार की अपात्र?, शिंदेंनी मांडलेला सत्तेचा डाव विस्कटणार की अभय मिळणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणारेत. तीन पक्षांची मोट बांधून निर्माण झालेल्या महाविकास आघाडीसह, शिंदेंना सोबत घेऊन सत्तेत सहभागी झालेल्या भाजपचेही डोळे आजच्या निकालाकडे लागले आहेत. 

Img 20231109 wa001228129905032016030159557
Img 20230717 wa0012281298961742807603730839
Img 20230511 wa0002282292969174931887579613

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये