पुणे शहर

कोथरूडमधील एकलव्य कॉलेज जवळील रखडलेल्या डीपी रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी ; जागा मालकाची जागा देण्याची तयारी..

मंत्री चंद्रकांत पाटील, जागा मालक संतोष बांदल व किरण दगडे पाटील यांच्यात झाली बैठक

कोथरूड : कोथरूडमधील एकलव्य कॉलेजपासून महामार्गाकडे जाणाऱ्या व अनेक दिवसांपासून रखडेलेल्या डीपी रस्त्याचे काम आखेर मार्गी लागणार आहे. एकलव्य कॉलेज जवळ जागा मालकाकडून जागा ताब्यात मिळत नसल्याने हा रस्ता रखडला होता पण आज उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जागा मालक पंढरीनाथ महिपती बांदल, संतोष बांदल व माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत तोडगा निघाला असून जागा मालकाने जागा देण्यास तयार दर्शिवल्याने हा रस्ता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास कोथरुडकरांना एक पर्याय मार्ग उपलब्ध होणार आहे.

जागा ताब्यात येऊन या रस्त्याचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या मध्यस्थीने जागा  मालक, शेतकरी पंढरीनाथ बांदल, संतोष बांदल, गोविंद रणपिसे यांच्यात आज निर्णायक बैठक झाली. या बैठकीत चर्चेअंती बांदल यांनी जागा देण्याची तयारी दर्शवली त्यामुळे अखेर या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघाला असे आता म्हणता येईल. 

Screenshot 20250327 192122 samsungnotes6439383861966424262

कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारकापासून एकलव्य कॉलेजपर्यंत डिपी रस्त्याचे काम झालेले आहे. एकलव्य कॉलेजपासून महामार्गापर्यंतचे काम रस्त्यासाठीची जागा ताब्यात न आल्याने अनेक वर्षापासून रखडलेले होते. जागा ताब्यात घेण्याचा प्रश्न न सुटल्याने  रस्ता होऊ शकला नव्हता. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील हा रस्ता व्हावा यासाठी प्रयत्नशील होते.  आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जागा मालकाने जागा देण्यास तयारी दर्शविल्याने हा डीपी रस्ता पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या संदर्भात किरण दगडे पाटील यांनी सांगितले की आज मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत जागा मालक बांदल यांनी जागा देण्याची तयारी दर्शविल्याने एकलव्य कॉलेज येथे अनेक वर्षांपासून रखडलेला रस्ता पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  हा रस्ता व्हावा यासाठी आमच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. आता हा मार्ग मोकळा झाल्याने कर्वे पुतळा,छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते महामार्गापर्यंत डीपी रस्त्याने येणे नागरिकांना सोयीचे होणार आहे आणि त्यामुळे पौड रस्त्यावरील ही वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे. लवकरच जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याचे काम पूर्ण करून घेण्यात येईल.

Img 20250310 wa02282851203640248970727

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये