अमोल बालवडकर यांची कोथरूड मधील 150 गणेश मंडळांना भेट, मंडळांकडून उस्फुर्त स्वागत

कोथरूड : भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोथरूड मतदारसंघातील सुमारे 150 मंडळांना भेट देऊन गणरायाची आरती केली.यावेळी मंडळांच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
अमोल बालवडकर यांनी पहिल्या व दुसऱ्या दिवशी कोथरुड परिसरातील नवभुमी मित्र मंडळ, मुठेश्वर मित्र मंडळ, हमराज मित्र मंडळ, नवयुग मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, साई मित्र मंडळ, जय हनुमान मित्र मंडळ, क्रांती मित्र मंडळ बालेवाडी, स्वराज्य युवा प्रतिष्ठाण बाणेर, श्री मोरया गणेश मंदिर अशा मंडळांना व विविध सोसायटीतील सभासदांना भेटी देत गणरायाचे मनोभावे आरती करुन दर्शन घेतले व मंडळातील तसेच सोसायटीतील सहकाऱ्यांसमवेत संवाद साधला.
अमोल बालवडकर यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने तिसर्या दिवशी कोथरुड परिसरातील समस्त गावकरी मित्र मंडळ, शिवसाम्राज्य मित्र मंडळ, तिरंगा मित्र मंडळ, नवभारत मित्र मंडळ, संघर्ष मित्र मंडळ, शिवकृपा मित्र मंडळ, अखिल भेलके नगर मित्र मंडळ, समाज सुधारक हिंदुस्थानी मित्र मंडळ, शिवांजली मित्र मंडळ, वीर चिरंजीव संजय गांधी मित्र मंडळ, क्रांतीवीर मित्र मंडळ, श्री दत्त मित्र मंडळ ट्रस्ट, महाराजा मित्र मंडळ, एकी तरुण मित्र मंडळ, बालाजी मित्र मंडळ, अखिल गोर बंजारा समाज मित्र मंडळ, शिवसाई मित्र मंडळ अशा मंडळांना व तेथील सभासदांना भेटी देत गणरायाची मनोभावे आरती करुन दर्शन घेतले व यावेळी विविध मंडळांनी आयोजित केलेल्या जिवंत देखावे पाहण्याचा योग देखिल आला. यावेळी मंडळातील सभासद व सहकाऱ्यांसमवेत मनमोकळे पणे संवाद साधला व परिसरातील विविध विषयांवर चर्चा केली.

अमोल बालवडकर यांनी तिसऱ्या दिवशी कोथरुड परिसरातील जयहिंद बाल तरुण मित्र मंडळ, मारुती मित्र मंडळ, बलभीम मित्र मंडळ, नरवीर मित्र मंडळ, म्हातोबा मित्र मंडळ, सन्मित्र मित्र मंडळ, श्री गुरुदत्त मित्र मंडळ(किंग्स ग्रुप), श्री साई मित्र मंडळ, बालशिवाजी मित्र मंडळ, जय मल्हार मित्र मंडळ, साईज्योत मित्र मंडळ, श्री अष्टविनायक मित्र मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ गुजरात कॅालनी, शिवशक्ती मित्र मंडळ पौड रोड, नवनाथ सार्वजनिक विकास मंडळ पौड रोड, श्रीकृष्ण मित्र मंडळ किश्किंदा नगर अशा विविध मंडळांना व तेथील सभासदांना भेटी देत गणरायाची मनोभावे आरती करुन दर्शन घेतले.



यावेळी बोलताना अमोल बालवडकर म्हणाले, या माध्यमातून कोथरूड मतदारसंघातील गणेश मंडळातील सभासद व सहकाऱ्यांसमवेत मनमोकळे पणे संवाद साधता आला तसेच कोथरुड परिसरातील गणेश मंडळांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या समस्या जाणुन घेवुन त्या तातडीने सोडविण्याचे कार्यकर्त्यांना आश्वासित केले.












