पुणे शहर

सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यावर कोसळली दरड

पुणे : सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यावर तीन ठिकाणी दरड कोसळली असल्याची माहिती मिळाली आहे. मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या   मुसळधार पावसामुळे गडावर जाणाऱ्या रस्त्यावर दरडी कोसळल्या असाव्यात असा अंदाज आहे.

सध्या कोरोना मुळे गडावर पर्यटनासाठी जाण्यास मज्जाव आहे. दरवर्षी पावसाळ्यात गडावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळण्याचे प्रकार घडत असतात.  सुट्टीच्या दिवशी असा प्रकार घडला तर या रस्त्यावर अनेक वेळा वाहतूक कोंडी झाल्याचे सर्वांना माहीतच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सध्या गडावर जाण्यासाठी बंदी असल्याने रस्त्यावर सामसूम आहे. त्यामुळे दरडीचे कोसळलेले दगड रस्त्यावर रविवार दुपार पर्यंत तसेच होते. रस्त्यावर रहदारी असली असती तर रस्त्यावर कोसळलेली दरड लगेच काढावी लागली असती. पण सध्या गडावर कोण येत जात नसल्याने रस्त्यावर कोसळलेली दरड तशीच आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये