पुणे शहर
कोथरूडमध्ये भीषण अपघात ; मिक्सरच्या चाकाखाली सापडून तरुणीचा मृत्यू

कोथरूड : कर्वे रस्त्यावर कोथरूड स्टँड समोर भीषण अपघात घडला असून या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज दुपारी बाराच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार कोथरूड स्टँड समोर रस्ता ओलांडत असताना मिक्सरचे चाक डोक्यावरून गेल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर काही काळ रस्ता बंद करण्यात आला होता तर तरुणीचा मृतदेह झाकण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील प्रक्रिया चालू आहे. या अपघातामुळे रस्त्यावरून बेफाम वेगात जाणाऱ्या मिक्सर ट्रकचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या अपघातात आरती सुरेश मनवाने (वय 23 रा. एरंडे होस्टेल भेलकेनगर, कोथरूड, मूळ रा. अमरावती) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे













