राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पुणे शहर आयोजित महाभोंडला व रास दांडिया कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या वतीने आयोजन..
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, (अजित पवार) पुणे शहराच्या वतीने नवरात्र महोत्सव निमित्त महाभोंडला आणि रास दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. नारायण पेठ, गोगटे प्रशाला या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमात महिला, युवतींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
यनिमित्ताने घेण्यात आलेल्या लकी ड्रॉ मधून ५ विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच सर्वोत्कृष्ठ नृत्य, सर्वोत्कृष्ठ ड्रेसिंग अश्या विजेत्यांना देखील बक्षिसे देण्यात आली. यावेळी महिला वर्गासाठी मसाला दूध वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांसाठी सेल्फी बूथ देखील ठेवण्यात आला होता.




यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर, उपाध्यक्ष दत्ता सागरे, कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, युवक अध्यक्ष समीर चांदेरे, करण मानकर, युवती अध्यक्ष पूजा झोळे, विध्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, सरचिटणीस अर्चना चंदनशिवे, रुहिसबा सय्यद, अर्चना हनमगर, सांस्कृतिक सेल अध्यक्ष विजय राम कदम, व्यापारी सेल अध्यक्ष वीरेंद्र किराड, गौरी जाधव, संगीता बराटे, शीतल मेदाने – येनपुरे, नरेश जाधव, राहुल तांबे, कोथरूड विधानसभा महिला अध्यक्ष तेजल दुधाने, लावण्या शिंदे, डिम्पल इंगळे, गौरी पिंगळे, प्रीती डोंगरे, माधवी मोरे, श्रेया तांबे, पद्मिनी ओसवाल, विजया भोसले, सुनीता चव्हाण, पूनम पाटोळे, नम्रता बोंदर, सत्यम पासलकर, उपस्थित होते.








