अमोल बालवडकर फाउंडेशन आणि आर्य वैश्य कोमटी समाज (श्री नगरेश्वर देवालय), पुणे यांच्या वतीने कोजागिरी उत्सवाचे आयोजन

पुणे : आर्य वैश्य कोमटी समाज (श्री नगरेश्वर देवालय), पुणे यांच्या आणि अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने ज्ञानदीप मंगल कार्यालय, सुस रोड, पाषाण येथे आयोजित करण्यात आलेल्या कोजागिरी उत्सवाला माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली.
आर्य वैश्य कोमटी समाजाच्या वतीने दरवर्षी सदरील सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आयोजित केला जातो. या कार्यक्रमाच्या दरम्यान विविध मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला. तसेच भव्य दांडियाचा कार्यक्रमही अतिशय उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमानंतर सुरुची भोजन व त्यासोबत मसाला दूधाचा आस्वाद नागरिकांनी घेतला.

माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी या कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित सर्वांशी विविध विषयांवर संवाद साधला आणि योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून सर्वांनी आपली मोलाची साथ आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्यावा असे आवाहन केले.
याप्रसंगी अनिल बाप्पू ससार,गौरव लक्ष्मीकांत रुद्रकंठवार, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, महाराष्ट्र आर्य वैश्य महिला महासभेच्या अध्यक्षा माधुरी कोले, वासवी सत्रं समुदायमचे अध्यक्ष देवकी व्यंकटेस्वरालू, वासवी सत्रं समुदायमचे सरचिटणीस अल्लूरी लक्षमैया, आर्य वैश्य कोमटी समाज (श्री नगरेश्वर देवालय) पुणे येथील अध्यक्ष लक्ष्मीकांत कोले आदींसह आर्य वैश्य कोमटी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












