भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, देवेंद्र फडणवीसांसह चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर
भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक समितीच्या वतीने आज विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली या यादीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांची उमेदवारी आज जाहीर करण्यात आली.
पुण्यातील कोथरूड मतदार संघात चंद्रकांत पाटील यांची, शिवाजीनगर मध्ये सिद्धार्थ शिरोळे तर पर्वती मधून माधुरी मिसाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपाच्या पहिल्या यादीत पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार
1. दौण्ड : ॲड राहुल कुल
2. चिंचवड : शंकर जगताप
3. भोसरी : महेश लांडगे
4. शिवाजीनगर : सिद्धार्थ शिरोळे
5. कोथरुड : चंद्रकांतदादा पाटील
6. पर्वती : माधुरी मिसाळ
7. सोलापूर उत्तर : विजयकुमार देशमुख
8. अक्कलकोट : सचिन कल्याणशेट्टी
9. सोलापूर दक्षिण : सुभाष देशमुख
10. मान : जयकुमार गोरे
11. कराड दक्षिण : डॉ. अतुल भोसले
12. सातारा : छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले
13. कोल्हापूर दक्षिण : अमल महाडिक
14. इचलकरंजी : राहुल आवाडे
15. मीरज : सुरेश खाडे
16. सांगली : सुधीर गाडगीळ
भाजपकडून आज अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे.भाजपकडून पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही जणांची तिकीट कापण्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे भोकरमधून खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याणमधून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कामाठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.