पुणे शहर

शिवाजीनगर मधील महायुतीचे उमेदवार  सिद्धार्थ शिरोळे उद्या अर्ज दाखल करणार…

पुणे : महायुतीचे छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार सिद्धार्थ शिरोळे आपल्या शेकडो समर्थकांसह उमेदवारी अर्ज आज (सोमवारी ) दाखल करणार आहेत.

या प्रसंगी महायुतीतील भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे नेते, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. शिवाजीनगरचे ग्रामदैवत श्री रोकडोबाचे दर्शन घेऊन सकाळी ९ वाजता पदयात्रेला प्रारंभ केला जाईल.आमराले दवाखाना,शिरोळे गल्ली,गणपती चौक,मॉडर्न शाळा,श्री जंगली महाराज मंदिर,बालगंधर्व चौक मार्गाने जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन असा पदयात्रेचा मार्ग आहे.

आमदार शिरोळे यांना सदिच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी व्हावे,असे आवाहन शिवाजीनगर भाजपचे निवडणूक प्रमुख दत्ताभाऊ खाडे यांनी केले आहे.

Img 20241020 wa00015243193050905147069
Img 20240404 wa0016281291197243699799508498
Img 20240404 wa0012281298841886320058264868
Img 20240404 wa0013281291032765212350995267

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये