पुणे शहर

अमोल बालवडकर यांची अखेर माघार, देवेंद्र फडणवीस यांनी काढली बालवडकर यांची समजूत; चंद्रकांत पाटील यांनी पेढा भरवत निर्णयाचे केले स्वागत

पुणे : भाजपाचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बंडखोरी करत निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आज कोथरूडमधील बंडखोरी रोखण्यास भाजपला यश आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते अमोल बालवडकर यांची समजूत काढत त्यांची नाराजी दूर केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी अमोल बालवडकर यांच्या घरी जात पेढा भरवत बालवडकर यांची समजूत काढली आहे.

कोथरूड मधून लढण्यासाठी अमोल बालवडकर इच्छुक होते. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारसंघातील घरोघरी ते पोहोचले होते. मात्र भाजपने विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील  यांना या मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली. त्यानंतर अमोल बालवडकर नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.

Img 20241020 wa00015243193050905147069

कोथरूड विधानसभा मतदारसंघात ते बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार अशी चर्चा सुरु होती. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली होती. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनीही बालवडकर यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमोल बालवडकर यांची नाराजी दूर केली आहे.

Img 20240404 wa0016281291197243699799508498

चंद्रकांत पाटील आणि अमोल बालवडकर यांचे मनोमिलन घडवून आणण्यात फडणवीस यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. चंद्रकांत पाटील यांनी पेढा भरवत बालवडकर यांची समजूत काढली आहे. दरम्यान आता बालवडकर यांनी विधानसभेतून माघार घेतली असून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

Img 20240404 wa0012281298841886320058264868
Img 20240404 wa0013281291032765212350995267

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये