महाराष्ट्र दिनानिमित्त मॉडर्न विकास मंडळ आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..

पुणे : महाराष्ट्र दिनानिमित्त मॉडर्न विकास मंडळ, पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात १८२ रक्तदात्यांनी रक्तदान करत आपले समाजाप्रती असणारे कर्तव्य बजावले.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सलग ३५ व्या वर्षी मॉडर्न विकास मंडळ, पुणेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पुणे शहर भाजपा अध्यक्ष धीरज घाटे, भाजपा महाराष्ट्र कार्यालयीन मंत्री रवी अनासपुरे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रवीण बढेकर, संपादक सकाळ माध्यम समूह (मल्टीमिडिया) चे श्री. अंकितजी काणे, माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष करण मिसाळ, जयंत भावे, यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.
या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा रक्तदान उत्तम प्रतिसाद मिळाला. या ३५ व्या रक्तदान शिबिराचे संयोजन डॉ. संदीप बुटाला व मनीषा बुटाला यांनी केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व पदाधिकारी व हितचिंतकांनी विशेष मेहनत घेतली.

या प्रसंगी माजी नगरसेवक दीपक पोटे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, भाजपा कोथरूड मध्य मंडलाचे अध्यक्ष निलेश कोंढाळकर, भाजपा कोथरूड दक्षिण मंडलाचे अध्यक्ष कुलदीप सावळेकर, सरचिटणीस दीपक पवार, बाळासाहेब टेमकर, अँड. मिताली सावळेकर, सचिन मोकाटे, दत्तात्रय भगत, अश्विनी जाधव, सुप्रिया माझिरे, विद्या टेमकर, दिनेश माझिरे, दिलीपराव उंबरकर, गिरीश भेलके, स्वाती मोहोळ, अमित तोरडमल, कुणाल तोंडे, सूचित देशपांडे, बाळासाहेब विचारे, सुनील गेहलोत, रवींद्र सारूक, सिताराम खाडे, सागर शेडगे इत्यादी मान्यवरांनी रक्तदान शिबिराला
भेट दिली.






