कोथरूडमध्ये थारचालकाने पाच – सहा दुचाकींना उडवले.; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

पुणे : कोथरूड मध्ये भरधाव वेगाने रस्त्यालगत पार्किंग केलेल्या दुचाकींना उडवत मद्यधुंद थारचालकाने पळ काढला. शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. हि सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या थारचालकाने कोथरूड परिसरातील युफोरिया होटेल समोर रस्त्यालगत पार्किंग केलेल्या दुचाकी वाहनांना जोरदार धडक देत येथून पलायन केले आहे. यामध्ये पाच ते सहा दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे.
ही घटना पुण्यातील कोथरुड युफोरिया परिसरात घडली आहे. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं समजतंय. या प्रकरणी थारचालकावर अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती भाजप नेत्या स्वरदा बापट यांनी दिली.

पुण्यातील युरोफिया कोथरुड परिसरात रात्रीच्या वेळी लहान मुले खेळण्यासाठी येत असतात. रात्री 8 : 25 वाजता गार्डन कोर्ट हॉटेलचा मालक ऋषी पुजारी मद्यपान करत चारचाकी चालवत होता. याचवेळी गाडीचा अंदाज न आल्याने पुजारीने दारुच्या नशेर पाच ते सहा दुचाकींना जोराची धडक देत उडवल्या आहेत. या गाडीच्या संपूर्ण काचा काळ्या रंगाच्या असून तुम्ही पुन्हा दुसरं पोर्शे अपघात होण्याची वाट पाहत आहात काय? असा सवाल स्वरदा बापट यांनी केला आहे.






