जागतिक पर्यावरण दिनी कोथरूडमध्ये जेष्ठ नागरिकांची जनजागृती प्रचार फेरी..

कोथरूड : जागतिक पर्यावरणदिनी कोथरूड मध्ये निघालेल्या जेष्ठ नागरिकांच्या जनजागृती प्रचार फेरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय, पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने “५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ” नवचैतन्य हास्य योगच्या जेष्ठ नागरिकांची जनजागृती प्रचार फेरी काढण्यात आली तसेच क्षेत्रिय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थानच्या परिसरात १७७ झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

“स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२५” अन्वये कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया लि., स्वच्छ व नवचैतन्य हास्य क्लब, यार्दी सहकारी संस्था जनवानी सहकारी संस्था, सेवा सहयोग फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ सहवास पुणे या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक १२, डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण आरोग्य कोठी अंतर्गत दरवर्षीप्रमाणे ५ जून २०२५ रोजी ” जागतिक पर्यावरण दिन” विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.



यावेळी जेष्ठ नागरिकांची जनजागृती प्रचार फेरी डहाणूकर कॉलनी कोथरूड गावठाण, गणंजय सोसायटी, गुजरात कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, गाढवे कॉलनी, शास्त्रीनगर परिसर, आझाद वाडी, कॉलनी, मयूर कॉलनी, आयडियल कॉलनी, इत्यादी परिसरामध्ये काढण्यात आली. सदर प्रचारफेरी मध्ये” झाडे लावा झाडे जगवा, प्लॅस्टिकचा वापर करू नका, पर्यावरणाचा ऱ्हास करू नका, आपण झाडे लावू या, पर्यावरणाचे रक्षण करू या, निसर्ग वाचवण्याची धरा कास तरच होईल मानवाचा विकास, पर्यावरणाची धरा कास तरच होईल मानवाचा विकास, पर्यावरण वाचवा भविष्य घडवा, वृक्षतोड करू नका मानवी जीवन धोक्यात आणू नका….!, वृक्ष आहेत पर्यावरणाचे आभूषण यामुळे कमी होते प्रदूषण…! पर्यावरणाला वाचूया पृथ्वीला जगण्यायोग्य बनवू या, अशा घोषणा देऊन पर्यावरणाची शपथ देण्यात आली.






सदर प्रचार फेरीमध्ये नवचैतन्य हास्य क्लबचे अध्यक्ष अशोक पुजारी, सरोजिनी कांबळे, शैलजा देशपांडे,गायत्री पानसे,मंगला ओनामे, इंदू चौधरी,शोभा धस, विजया यादव, लतिका सांगळे, अशोक शाळू जनसेवक बाळू दांडेकर व त्यांचे ९० जेष्ठ नागरिक व्यायाम करणारे ४० नागरिक सहभागी झाले. या जनजागृती प्रचारफेरी विशेष आकर्षण म्हणजे यातील सर्व जेष्ठ नागरिक ६५ ते ९५ वयोगटातील सहभागी झाले होते. सदर कार्यक्रम उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त दिपक राऊत वरिष्ठ आरोग्य आरोग्य निरीक्षक राम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थानचे प्रमुख डॉ. अरुण गुरव, डॉ. श्रीरंग जमदग्नी, डॉ. अनुराग कुमार, डॉ. विनोद आबनावे यांच्या हस्ते आयुर्वेदिक अनुसंधान संस्थानच्या परिसरामध्ये १७७ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.



आरोग्य निरीक्षक करण कुंभार, सचिन लोहकरे, गणेश साठे, गणेश चोंधे, दत्ता दळवी, जया सांगडे, प्रमोद चव्हाण, लक्ष्मीकांत कुलकर्णी मोकादम वैजीनाथ गायकवाड, अण्णा ढावरे यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे उपक्रम राबविण्यासाठी परिश्रम घेतले. मोकादम अशोक कांबळे, साईनाथ तेलंगी, गणेश चव्हाण सेवक परेश कुचेकर, कुणाल जाधव, प्रविण कांबळे, कमिन्स इंडिया लिमिटेड चे संदीप क्षीरसागर, संपत खैरे व सागरमित्र या संस्थेचे पदाधिकारी यांनी मा. बाळासाहेब ठाकरे उद्यान परिसरात स्वच्छता मोहिम राबवली. या उपक्रमात यार्दी सहकारी संस्थेच्या प्रमिला घोरपडे, स्वच्छचे सोहम खिलारे सेवासयोगचे मंदार जाधव, युवराज चाबुकस्वार, हेमंत झाडे, जनवानी, नवचैतन्य हास्य क्लब, सागर मित्र, व इतर स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी तसेच सर्व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.



