पुणे शहर

पुण्यात राजेश पळसकरांसाठी शिवसेनेनं निर्माण केलं नवीन पद अन् दिली महत्त्वाची जबाबदारी !

पुण्यात शिवसेना बळकट करण्यासाठी एकनाथ शिंदें प्रयत्नशील

पुणे: आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याप्रमाणेच एक नवीन युवासेना पुणे महानगरप्रमुख पद निर्माण करून त्यांनी युवासेनेची महत्त्वाची जबाबदारी राजेश पळसकरांवर सोपवली आहे.

राजेश पळसकर हे पुण्यातील शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करीत त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता तेव्हापासूनच पळसकरांवर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.

पुणे शहर आणि जिल्हाच्या अनेक भागांमध्ये पळसकरांचे मोठे नेटवर्क असून अनेक कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत. ही बाब लक्षात घेऊन त्यांची युवासेनेच्या पुणे महानगरप्रमुख पदी निवड करुन शिंदेंनी मास्टरस्ट्रोक मारल्याचे बोलले जात आहे.

एकनाथ शिंदे पुण्यात जातीने लक्ष घालत असून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नवनवीन योजना आखत आहेत. आगामी महापालिका निवडणूक युती मधून किंवा वेगळी लढली तरी पुण्यात शिवसेनेचे वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचे दिसत आहे. पक्ष वाढीसाठी राजेश पळसकरांच्या माध्यमातून शिवसेनेला धडाडीचे नेतृत्व मिळाले असून त्याचा फायदा शिवसेनेला होईल असे बोलले जात आहे.

Img 20250508 wa0001235733770892078245

महानगर प्रमुख म्हणून काय जबाबदारी?
युवासेना पुणे महानगरप्रमुख पद हे शिंदेंच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. महानगर प्रमुखाच्या अंतर्गत संपूर्ण पुणे शहरातील युवासेनेची संघटनात्मक बांधणी, प्रचार, निवडणूक तयारी आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व घडवण्याची जबाबदारी या पदावर असलेल्या व्यक्तीवर असणार आहे.

Img 20240404 wa0013282293280934616164697357

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये