भाजप विरोधकांची मोट बांधणार ‘हे ‘ सीएम

हैद्राबाद : भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारच्या विरोधात सर्व पक्षांची एकजूट बांधण्याचा प्रयत्न यापूर्वी झाले. गेल्या खेपेस शरद यादव, शरद पवार, चंद्राबाबू नायडू ही नेतेमंडळी मोदी विरोधासाठी एकत्र आली होती. महाराष्ट्रात भाजप विरोधक एकत्र आले आहेत.
आता देशपातळीवर भाजप विरोधकांना एकत्र आणण्यासाठी तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव सरसावले आहेत. देशभरातील भाजप विरोधी नेते आणि संघटनांशी मी बोलणार असून डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हैद्राबादमध्ये परिषद घेणार आहे.असे राव यांनी म्हटले आहे. मोदी सरकारच्या विरोधात एकत्रित लढा देण्याची गरज असून माझा पक्ष यात आघाडीवर राहील असे राव यांनी म्हटले आहे.
पुढील वर्षाच्या प्रारंभी पश्चिम बंगाल आणि तामीळनाडू या मोठ्या राज्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यापूर्वी भाजप विरोधकांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे.










