उद्यानांमधील स्वच्छतेच्या कामाची
आमदार शिरोळे यांनी केली पाहणी

पुणे – महापालिकेच्या चित्तरंजन वाटिका आणि हिरवाई उद्यान यांच्या स्वच्छता आदी कामांची पाहणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (शुक्रवारी) केली. आठ महिने बंद असलेली उद्याने नागरिकांच्या स्वागतासाठी आता सज्ज झाली आहेत असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

कोरोना संसर्गाच्या कारणाने महापालिका उद्याने गेले आठ महिने बंद होती. त्यातील ८१ उद्याने ०१ नोव्हेंबर पासून खुली होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शिवाजीनगर मतदारसंघातील मॉडेल कॉलनी येथील चित्तरंजन वाटिका, भांडारकर रोड येथील हिरवाई उद्यान आदी उद्यानांची महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समवेत पहाणी केली.



उद्यानात आल्यावर नागरिकांची स्वच्छतेबाबत कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. उद्यानांमध्ये येणाऱ्या नागरिकांनीही कोरोनाचा फैलाव होणार नाही याची दक्षता घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे ‘जब तक दवाही नही तब तक ढिलाई नही’ याप्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन आमदार शिरोळे यांनी नागरिकांना केले.
या पाहणी दौऱ्यात दत्ताभाऊ खाडे, रविजी साळेगांवकर, प्रतुलजी जागडे, गणेशजी बगाडे, जयजी जोशी, निलेश धोत्रे आदी सहभागी झाले होते.



