पुणे शहर, जिल्हा

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या उरळी देवाची शाखेची स्थापना..

पुणे जिल्ह्यातील सर्व ब्राह्मण समाज जोडण्याचे उद्दिष्ट : मंदार रेडे

पुणे : उरळी देवाची (उरळी देवाची, येवलेवाडी, उंड्री पिसोळी, वडकी,कात्रज-फुरसुंगी रोड, दिवे घाट,कानिफनाथ) येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची पुणे जिल्ह्यातील शाखा क्रमांक 24 ची स्थापना उत्साहात करण्यात आली.

गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या व नव्याने समाविष्ट झालेल्या या भागातील विखूरलेला ब्राह्मण समाज एकत्र आणण्याच्या दृष्टिकोनातून या शाखेची स्थापना करण्यात आली आहे. भगवान परशुराम जयंतीनिमित्त या शाखेच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करून या भागातील जास्तीत जास्त ब्राह्मण कुटुंबे जोडण्याचे या वेळी उपस्थितांनी ठरवले.

गेल्या तीन वर्षात पुणे जिल्ह्यात एकूण 24 शाखा सुरु करण्यात आल्या व पुणे जिल्ह्यातील सर्व ब्राह्मण समाज जोडण्याचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी ब्रह्मद्योग आघाडीचे अक्षय जोशी, सुप्रिया कुलकर्णी, सुयोग सोंडुर व या भागातील अनेक समाजबांधव उपस्थित होते.

Img 20260222 wa00062533337530738087765

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये