पुणे शहर

पुणे महापालिकेच्या वाहनावर दगडफेक, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; अतिक्रमण कारवाई दरम्यान घडला प्रकार 

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागामार्फत आज गुरुवार, दि.०२/०७/२०२६ रोजी लोहगाव परिसरातील अनधिकृत बांधकाम हटविण्याची नियोजितकारवाई करण्यात येणार होती. या कारवाईकरिता अतिक्रमण / अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागामार्फत जॉ कटर मशिन खराडी बायपास जवळ उभे करण्यात आले होते. त्यानंतर सकाळी ८.०० वाजण्याच्या सुमारास काही व्यक्तींनी शासकीय कामात अडथळा निर्माण करत महानगरपालिकेच्या जॉ- कटर मशिन वाहून नेणाऱ्या ट्रेलरवर आणि जॉ कटर मशिनवर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये वाहनाच्या पुढील काचेचे नुकसान झाले.

सदर घटनेनंतर संबंधितांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी विमाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Img 20251125 wa01783213374507166536090

अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागामार्फत पुणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई करण्यात येईल. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करणे किंवा

महानगरपालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करणे अशा प्रकारांना कोणतीही व कसल्याही प्रकारची मुभा दिली जाणार नाही. पुणे महानगरपालिका कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता, कायद्यानुसार व निष्पक्षपणे कारवाई करत राहील. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये