पुणे शहर

बाणेरमधील आरक्षित जागा पुस्तक न्यासाला; शिवसेनेची चौकशीची मागणी..

पुणे : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ बाणेर-बालेवाडी येथील भाजी मंडईसाठी आरक्षित असलेली अत्यंत मोक्याची जागा राष्ट्रीय पुस्तक न्यासाला तब्बल २९ वर्षांसाठी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्याच्या नियमांना हरताळ फासून ही जागा देण्यात आल्याचा आरोप करत याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहराच्या वतीने करण्यात आली आहे.

नुकतेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बाणेर येथील राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे (NBT) भूमिपूजन करण्यात आले आहे. यातच शिवसेनेने केलेला विरोध यावर नवीन वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत शिवसेनेचे पुणे सहसंपर्कप्रमुख गजानन थरकुडे यांनी महापालिका आयुक्त तसेच मालमत्ता विभागाकडे निवेदन दिले आहे. महापालिकेच्या नवीन नियमानुसार तीन वर्षांपेक्षा अधिक काळ कोणतीही महापालिका मालमत्ता देता येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. असे असताना बाणेर- बालेवाडीतील सदर जागा २९ वर्षांसाठी कोणत्या नियमावलीच्या आधारे देण्यात आली? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

Img 20260222 wa00063491038201882637992



शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे सहसंपर्कप्रमुख गजानन थरकुडे म्हणाले, राष्ट्रीय पुस्तक न्यासाला ही जागा देताना तिचे मूल्यांकन करण्यात आले होते का? जागा देण्यासाठी कोणती निविदा प्रक्रिया राबविण्यात आली? कोणत्या नियमांतर्गत ही जागा देण्यात सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले बनवून प्रशासन काम करत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या सभागृहातदेखील एका माननीयांनी अशा प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नावर काय झाले, हे समजले नाही. केवळ रुपया घेऊन हे करार केले जातात. त्यामुळे या विषयावर आवाज उठविला पाहिजे.तसेच सदर प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता का? याची माहिती महापालिका प्रशासनाने द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पुस्तक संस्कृतीला नवी ऊर्जा; बाणेरमध्ये राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे (NBT) च्या क्षेत्रीय कार्यालयाचे भूमिपूजन

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
https://www.sinhasannews.com/new-impetus-for-book-culture-groundbreaking-ceremony-for-the-national-book-trust-nbt-regional-office-in-baner-major-success-for-minister-chandrakant-patils-follow-up-efforts-27138/

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये