पुणे शहर

देशातील पहिली क्रांतीकारी विद्यार्थिनी मुक्ता साळवे यांचे स्मारक उभारण्यात यावे – राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाची मागणी

सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरु नितिन कळमळकर यांना दिले निवेदन

पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या परिसरामध्ये देशातील पहिली क्रांतीकारी विद्यार्थिनी मुक्ता साळवे यांचे स्मारक उभारण्यात यावे. आणि मुलींच्या वसतीगृहास मुक्ता साळवे यांचे नाव द्यावे अशी मागणी आज सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरु नितिन कळमळकर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विजय बापु डाकले यांनी केली.(The memorial of Mukta Salve, the first revolutionary student of the country, should be erected – demanded by the Nationalist Social Justice Department)

शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेला संघर्ष आणि त्यांची पहिली विद्यार्थिनी म्हणुन मुक्ता साळवे या इतिहासात अजरामर आहेत. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देऊन सरकारने त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे, मुक्ता साळवे यांचा पुतळा बसवून व वस्तीगृहास त्यांचे नाव देऊन त्यांच्याही क्रांतीकारी कार्याला ऊजाळा द्यावा यासाठी विजय डाकले यांनी विद्यापीठाचे कुलगुरु नितिनजी कळमळकर यांची भेट घेऊन चर्चा केली.

Img 20210116 wa0007

यावेळी कुलगुरुंनी याबाबत नाव देण्याबाबत सकारात्कमता दाखवून नाव देण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.या बैठकीसाठी लो. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ बचाव कृती समितीचे अध्यक्ष विनोद शिंदे, राष्ट्रवादीचे युवक शहर ऊपाध्यक्ष सचिन डाकले आदी हजर होते.

1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020 scaled

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये