पुणे शहर

कोथरूडमधील तरुण-तरुणींसाठी शिवकालीन युद्धकला अवगत करण्यासाठी सुवर्णसंधी.

कोथरूड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस ॲड. किशोर शिंदे यांच्या २४ जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित कक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव तथा कोथरूड उपविभाग अध्यक्ष संजय काळे आणि प्रभाग अध्यक्ष गणेश शिंदे यांनी कोथरूड मधील तरुण-तरुणींसाठी मोफत सिलंबम (मर्दानी खेळ) शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे मोफत आयोजन केले आहे.( A golden opportunity for the youth of Kothrud to get acquainted with the martial arts of the ShivaJi Maharaj period.)

सदर प्रशिक्षणाचा कालावधी ३१ जानेवारी २०२१ ते ३ मार्च २०२१ असा असून रोज सायंकाळी ठीक ४ ते ६ यादरम्यान मुख्य प्रशिक्षक कुंडलिक कचाले सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जाईल. सदर प्रशिक्षण शिबिराचा उद्घाटनाचा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय अनिलजी शिदोरे, सन्माननीय राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर आणि पुणे शहराचे अध्यक्ष अजय शिंदे यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ठीक ५ वा. जीत मैदान, पौड रोड,कोथरूड,पुणे या ठिकाणी होईल.

Img 20210116 wa0007

सदर प्रशिक्षण शिबिरामध्ये तलवारबाजी,लाठी काठी चालवणे,दांडपट्टा चालवणे,भाला फेक,भाला चालविणे आदी मर्दानी खेळांचे,युद्धकलेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरुड विभाग व संयोजक संजय काळे यांच्या वतीने कोथरूड मधील तरुण-तरुणींना आवाहन करण्यात येते की आपण बहुसंख्येने या शिबिरामध्ये सहभागी होऊन या शिवकालीन युद्धकलेचा प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा…

1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020 scaled

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये