पौड रस्त्यावर पुर्वर्वैमनस्यातून तीक्ष्ण हत्याराने तरुणावर वार…

पुणे : कोथरूड परिसरात एका सराईत गुन्हेगारांना तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचा प्रकार समोर आलाय पौड रस्त्यावरील मामासाहेब मोहोळ शाळेसमोर हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अमोल रमेश गोडांबे (वय 31 ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत तरुणाच्या आईने सविता राजेंद्र सिंग परदेशी (वय 52)यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे यात आकाश हा तरुण जखमी झाला आहे.(Young man attacked with sharp object )
आरोपी व आकाश ते एकमेकांना ओळखत होते त्यांच्यात यापूर्वी वाद झाले होते.रविवारी मध्यरात्री फिर्यादी यांचा मुलगा आकाश हा मामासाहेब मोहोळ शाळेसमोर थांबला होता.त्यावेळी अमोल गोडांबे हा येथे आला त्याने पूर्वी जे वादातून आकाश त्याच्याशी वाद घातला. व त्याच्या डोक्यात सत्तुरने वार केले.
त्यानंतर मोठ्यामोठ्याने आरडाओरड करत परिसरात दहशत माजवली यानंतर तो तिथून पसार झाला. या हल्ल्यात तरूण जखमी झाला आहे.आकाशच्या आईने फिर्याद दिल्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल करून त्याला पकडले आहे. कोथरूड पोलीस स्टेशन अधिक तपास करत आहे.



