कोथरुड

कोथरुड मधील आयडियल सोसायटीत रक्तदान शिबिराचे आयोजन ; ८४ पिशव्या रक्त संकलित..

कोथरुड : आयडियल सोसायटी व रा. स्व. संघ, जनकल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, सोसायटीच्या मैदानावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना गटनेते, स्थानिक नगरसेवक पृथ्वीराज सुतार व जनकल्याणचे डॉ. अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिरास प्रारंभ झाला. या शिबिरात सुमारे ८४ पिशव्या रक्त संकलीत करण्यात आले. Organizing a blood donation camp at Ideal Society in Kothrud
 

यावेळी बोलताना पृथ्वीराज सुतार म्हणाले, “सध्या हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा असताना सामाजिक जबाबदारीचा जाणीवेतून सोसायटीचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. सध्या जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज आहे. सध्याच्या आपत्कालीन काळामध्ये रक्तदान करणारे रक्तदाते देवदूतच  आहेत.  

Img 20210223 wa0156

यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी प्लाझ्मा दानाबाबत माहिती देऊन या संदर्भात जनजागृतीची गरज असल्याचे सांगितले. शिबिरात सुमारे ८४ पिशव्यांचे रक्त संकलन करण्यात आले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार वढावकर, शैलेश बुरसे , मकरंद केतकर, अरुणा एरंडे, दयानंद जवळकर, भुषण जोशी, विठ्ठल गुरव, मामा परांजपे, सोमदत्त पटवर्धन, वैजयंती केतकर, सुनिला शेंडे, रविंद्र गांधी तसेच रा.स्व.संघाचे मंदार ओक, समीर कुलकर्णी, प्रशांत पाटील आदि उपस्थित होते. नगरसेविका वासंती जाधव तसेच भा. ज. प. महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शिबिरास भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये