महाराष्ट्र

नाभिक समाजावरील व्यवसाय बंदी उठवत न्याय देण्याची बारा बलुतेदार संघाची मागणी- रामदास सूर्यवंशी

पुणे :महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी काल सलून व्यावसायिक व आम्हा संघटनांशी न बोलता बंदी जाहीर केली एका बाजूने श्रमिकांना त्रास होणार नाहि असे ते म्हणाले तसेच काँग्रेस नेत्यांनीदेखील लाॅकडाऊन/बंदी आधी वंचित घटकांसाठी आर्थिक नियोजन करावे अशी मागणी केली होती त्याचाही विचार न करता डायरेक्ट बंदी घालताना शिवशाहीला मानणारे सरकार आमचे असे म्हणणारे मुख्यमंत्री दडपशाही करतात हे योग्य नाही सलूनबंदीचा आम्ही बारा बलुतेदार संघाच्यावतीने निषैध करतो व तात्काल बंदी उठवण्याचीही मागणी करताना खालील मागील कालातील मागण्यांची पूर्ती करावी असे आवाहन महाविकास आघाडी सरकारला आम्ही बारा बलुतेदार विकास संघाच्यावतीने करीत आहोत असे प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी म्हणाले.

Img 20210223 wa0156

यावेळी ते पुढे म्हणाले की याच बरोबर खालील मागण्यांची पूर्ती करावी.

        बारा बलुतेदार संघाच्या मागण्या

1)सलून दुकानाचे भाडे व घरचे भाडे माफ करावे
2)सलून दुकान व घरचे लाईट बिल माफ करावे
3)मागील लाॅकडाऊनमुळे नुकसान झालेल्या प्रत्येक नाभिक बांधवांच्या बँक अकाउंटला 25 हजार रुपये मदत द्यावी
4)सलून विमा व आरोग्य कवच योजना सुरु करीत 5 लाखाचे सुरक्षा कवच प्रत्येक नाभिकाला द्यावे

5)सर्वांत जास्त 19 आत्महत्या या सलून व्यावसायिकांच्या झालेल्या आहेत हे सलून व्यावसायिक पुढीलप्रमाणे ……….

अ) कै. स्वप्नील चौधरी वय-30 रा.-दुर्गापूर, चंद्रपुर जिल्हा

ब) कै. दीपक तुळशीराम महोकार वय-43 मु. पोस्ट तह. अकोट, जिल्हा- अकोला

क) कै. नवनाथ साळुंके वय-35 मु.पोस्ट इरळी, तह-कवठेमहांकाळ जिल्हा-सांगली

ड) कै. शांताराम श्रावण शिरसाठ वय- 42 मु.पोस्ट तह-शिरपूर जिल्हा-धुळे

इ) कै. रामराव चांदूरकर वय-55 मु.पोस्ट-खानापूर तह-मोर्शी

फ) कै. रामदास गोविंदराव कडुकर वय-58 मु.पोस्ट-नरसाळा तह-मारेगाव

ग)कै. नितीन सुरेश राऊत मु.पोस्ट-नरसाळा तह- मारेगाव

म) कै. दीलीप कापसे वय-59 राहणार-यादव नगर नागपूर*

ल) कै. चंद्रकांत कोंडीराम दळवी
रा.ईस्थळ ता. केज जि.बीड

य) कै. अशोक नामदेव बानक वय-३५ रा. डवकी ता. देवरी, जिल्हा.गोंदिया.

र) कै.मनोहर नास्नुरकर वय –      रा. नागपूर शहर  जिल्हा. नागपूर.

व) कै.रावसाहेब नामदेव शेजूळ
वाय 35 रा. मुकूनदवाडी ता. जी. औरंगाबाद.

स) पिंटू केशवराव नक्षीणे
वय 32 राहणार, कवठा
ता,समुद्रपुर जिल्हा, वर्धा

अजून किती बळी घेणार आहे राज्य सरकार या सर्व सलून व्यावसायिकांच्या आत्महत्येला सर्वस्वी राज्य सरकारच जबाबदार  असून त्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ 5 लाखाची मदत सरकारने करावी.

6)बारा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी

7)बलुतेदारांच्या विकासासाठी अभ्यास आयोग स्थापन करावा

8)सलून बंदी उठवावी

9)1 ली ते 10 ची विद्याथ्यांची शालेय फी माफ करावी.
आदी मागण्या आहेत.

        जर आपण न्याय देणार नसाल तर मात्र समाज आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील तसेच आत्महत्या झाल्यास त्यालाही सरकारच जबाबदार राहील.
     अन्यथा महाराष्ट्रात सलून माध्यमातून मा.उध्द्ववा अजब तुझे महाविकास सरकारचा नामघोष करण्यात येईल.त्यानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
       आमचे सलून किव्वा पार्लर बंद करून राज्यातील कोरोना जाणार आहे का हा प्रश्न आमच्या मनात आहे.मागील काळात आधीच्या लाॅकडाऊनने कंबरडे मोडलेल्या नाभिक समाजाचे वाटोळे करण्याचा घाट घातलेला दिसतोय अन्यथा इतक्या आत्महत्या होऊनही सरकार या समाजाला गृहीत धरून बंदी टाकत आहे आपण ही बंदी तात्काळ मागे घ्यावी यासाठी आम्ही प्रथम लोकशाही मार्गाने यापत्राद्वारे राष्ट्रपती,पंतप्रधान,मुख्यमंत्री,राज्यपाल,उपमुख्यमंत्री,ओबीसी-महसूल-आरोग्य-गृह-सामा न्याय मंत्री यांच्याकडे विंनती करत बारा बलुतेदार विकास संघाच्यावतीने ईमेलसह प्रत्यक्षरित्या करण्यात आली आहे. तसेच मागण्या पूर्ती न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन नाभिक व बलुतेदार समाजातून छेडण्यात येईल अशीही माहीती प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांनी दिली.यावेळी राजेश भोसले,बाबासाहेब कदम,हेमंत श्रीखंडे,प्रशांत गायकवाड,माऊली रायकर,राजेंद्र पंडित,माऊली रायकर,उत्तम मंडलीक,रवी मावडीकर,उध्दव कावरे,सचिन राऊत,समशेर शेख,भिष्मा गायकवाड,राजा गायकवाड,नितीन राऊत,रोहीत यवतकर,सचिन उदावंत,सूर्यकांत भोसले आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये