पुणे शहर
कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत केलेल्या आवाहनाला कमी वेळेत प्रतिसाद १०१ रक्तादात्यांनी केले रक्तदान

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र रक्ताचा प्रचंड तुटवडा भासत असल्याने नगरसेवक दिपक पोटे यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील , शहराध्यक्ष जगदीश मुळीक , स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी भेट दिली व या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
या शिबिरामध्ये १०१ व्यक्तींनी आज रक्तदान केले. यावेळी संघटन सरचिटणीस राजेश पांडे , सरचिटणीस गणेश घोष , सरचिटणीस राजेश येनपुरे ,परिवाराचे धनंजयजी काळे कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी , स्थानिक नगरसेवक जयंत भावे , नगरसेविका सौ.मंजुश्री खर्डेकर शहर,मतदारसंघ पदाधिकारी प्रभाग 13 पदाधिकारी,कार्यकर्ते व मित्र परिवार उपस्थित होते.




