पुणे शहर

वैकुंठ स्मशानभूमीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वरूपवर्धिनी, सेवा सहयोग आणि सुराज्य प्रकल्प माध्यमातून अंत्यसंस्कारासाठी सेवा कार्यास प्रारंभ

वैकुंठमधील स्वयंसेवकांसाठी चरणजित सहानी मित्र परिवार व क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे पीपीई किट व अन्य साहित्य भेट

पुणे : वैकुंठ स्मशानभूमी  येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  स्वरूपवर्धिनी, सेवा सहयोग आणि सुराज्य प्रकल्प यांच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने अंत्यविधी व अंत्यसंस्कारासाठी सेवा कार्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

शहरातील सर्वच स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी गर्दी होत आहे.ही परिस्थिती पाहता पुणे मनपा ने वैकुंठ स्मशानभूमीतील दोन शेड लाकडावरील अंत्यसंस्कारासाठी खुल्या केल्या. ह्या ठिकाणी मयताच्या कुटुंबीयांना मदत करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वरूपवर्धिनी, सेवा सहयोग आणि सुराज्य प्रकल्प यांच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने 
अंत्यविधी व अंत्यसंस्कारासाठी प्रत्यक्ष सेवा कार्यास प्रारंभ केला असून स्वयंसेवक प्रत्यक्ष अंत्यसंस्कारासाठी मदत करत आहेत.

Img 20210421 wa0018 1

या स्वयंसेवकांसाठी आणि चरणजीत सहानी मित्र परिवार आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने पी पी इ किट, मास्क, सॅनिटायझर इ साहित्य भेट देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे महानगर सहकार्यवाह सचिन भोसले यांनी चरणजीत सहानी व क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्या कडून हे साहित्य स्वीकारले. यावेळी स्वरूपवर्धिनी चे निलेश धायरकर, सेवा सहयोग चे अतुल नागरस,सुराज्य प्रकल्प चे विजय शिवले उपस्थित होते. यावेळी दलजीत सिंग रँक, शैलेश बदडे, ऍड सुनील ठाकूर, रामदास सूर्यवंशी इ उपस्थित होते. याठिकाणी कोरोनाग्रस्त मयताच्या मृतदेहसोबत मोजक्याच नातेवाईकांना येण्यास परवानगी असून त्यांना होणाऱ्या त्रासाची जाणीव झाल्यावर तातडीने अंत्यसंस्काराच्या सेवाकार्यास प्रारंभ केला व येथील स्वयंसेवक चिता रचण्यासह सर्व कार्यात प्रत्यक्ष सहभागी होता असल्याचे सचिन भोसले यांनी सांगितले. सेवा है यज्ञकुन्ड समिधा सम हम जलें ध्येय महासागर में सरित रूप हम मिलें  या नुसार हे कार्य सुरु असल्याचेही ते म्हणाले. या अत्यंत महत्वाच्या सेवाकार्यात क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि चरणजीत सहानी मित्र परिवार सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही संदीप खर्डेकर व चरणजीत सहानी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये