आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक मदतीतून पुणे शहरासाठी दहा व्हेंटिलेटर

पुणे : सध्याच्या कोविडच्या आपत्तीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली , महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री, युवसेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक मदतीतून पुणे शहरासाठी नोकार कंपनीचे दहा व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. Ten ventilators for Pune city with the personal help of Aditya Thackeray
शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्रचे समन्वयक रविंद्र मेर्लेकर पुणे शहर शिवसेना संपर्कप्रमुख बाळा कदम यांच्या हस्ते हे व्हेंटिलेटर पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
या प्रसंगी पुणे मनपा शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, विजय देशमुख, नगरसेवक अविनाश साळवे, नगरसेविका संगिता ठोसर, नगरसेवक विशाल धनवडे, नगरसेविका पल्लवी जावळे, उपशहरप्रमुख उल्हास शेवाळे, विभागप्रमुख प्रविण डोंगरे, राहुल जेकटे, युवराज पारेख आदी उपस्थित होते.




