पुणे शहर

स्वत:लाच बनवा स्वत:च्या मदतीचा हात विजय गोखले यांचा कलाकारांना सल्ला

प्रकाश बालवडकर यांच्या सहकार्यातून आम्ही एकपात्री महाराष्ट्रतर्फे कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पुणे : कलाजीवन हा संपूर्ण जीवनाचा एक भाग आहे; कलाक्षेत्रातील मंडळींनी भविष्याचा वेध घेऊन स्वत:च्या हातालाच स्वत:च्या मदतीचा हात बनवून घेणे आवश्यक आहे. कलाजीवनालाच जीवन बनविण्याचा आततायीपणा करू नका, शाश्वत उत्पन्नाचा आधार असेल तरच कला क्षेत्रात या, असा वडिलकीचा सल्ला ज्येष्ठ विनोदी रंगकर्मी विजय गोखले यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूड परिसरातील 51 कलाकारांना भाजपाच्या पुणे शहर सहकार आघाडीचे प्रभारी प्रकाश बालवडकर यांच्या सहकार्यातून आणि आम्ही एकपात्री महाराष्ट्रच्या माध्यमातून अन्नधान्य आणि जीवनावश्यक साहित्याचे वाटप आज करण्यात आले, त्या प्रसंगी गोखले बालत होते.

Img 20210522 wa0207

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमास प्रकाश बालवडकर, मयुरी प्रणवराजे बालवडकर, सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर, संवाद पुणेचे सुनील महाजन, आम्ही एकपात्री महाराष्ट्रचे मारुती यादव, वंदन राम नगरकर, अनुपमा खरे, बाळकृष्ण नेहरकर, शेखर केदारी, प्रविण शिधये, मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, उद्योजक समीर पाटील, संतोष लांडे, गिरीश खत्री, पुनीत जोशी आदी उपस्थित होते.

गोखले म्हणाले, कलाकारांच्या अंगी जिद्द, चिकाटी असेल तर समस्यांवर मात करता येते आणि प्रोत्साहन देणारी मंडळी असतील तर त्या प्रोत्साहनाच्या पाठींब्यावरच मदतीचे पर्वतही उभे करता येतात.विवेक वेलणकर म्हणाले, कला क्षेत्रातील मंडळींना एकमेकांच्या सहाय्याने मदतीचा हात दिला जात आहे, ही अनुकरणीय बाब आहे. प्रत्येकाने अशाच पद्धतीने सहकार्याचा हात दिला तर मदतीपासून कुणी वंचित राहणार नाही.कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मयुरी बालवडकर यांनी विषद केली.

सुनील महाजन म्हणाले, गेल्या दिड वर्षापासून देणार्‍यांचे हात बघत आहोत. पडद्यामागील कलाकार-तंत्रज्ञांना दानशूरांच्या माध्यमातून सातत्याने मदत करण्यात येत आहे. वंदन राम नगरकर म्हणाले, योग्य व्यक्तीला मदत मिळण्यासाठी आम्ही केवळ माध्यम म्हणून काम करीत आहोत. सध्या उद्भवलेल्या संकटाविरुद्ध सगळ्यांनी एकत्र येऊन लढा द्यायचा आहे. पुनीत जोशी, समीर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.मारुती यादव यांनी प्रास्ताविक तर बाळकृष्ण नेहरकर यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये