भीम आर्मी भारत एकता मिशन संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी अमर पंडागळे

पुणे : भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी अमर पंडागळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Amar Pandagale as Maharashtra State Vice President of Bhim Army Bharat Ekta Mission
संस्थापक चंद्रशेखर आजाद व राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग यांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य प्रभारी दत्तूजी मेढे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रफुल्ल शेंडे, महाराष्ट्र राज्य महासचिव सीताराम गंगावणे यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजीमहाराज , छत्रपती शाहूमहाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक विषयांवर बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी लढण्यासाठी सदैव काम करणार असल्याचे पंडागळे यांनी निवडीनंतर सांगितले. त्यांनी यापूर्वी पुणे जिल्हा अध्यक्ष, पुणे जिल्हा सचिव म्हणून काम केलेले असून त्यांना आता महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे.



