पुणे शहर

कोरोना काळात निधन झालेल्यांना वृक्षारोपण करून श्रध्दांजली वाहण्याचा अंकूर प्रतिष्ठानचा उपक्रम

पुणे : ५ जून जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून कर्वेनगर येथील अंकूर प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने कोरोना काळात ज्यांचे निधन झाले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण करण्याचे तसेच अन्य कारणास्तव जसे की वाढदिवसानिमित्त, आपल्या प्रियजनांसाठी, निसर्ग संवर्धनासाठी, पुढच्या पिढीसाठी वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले होते या ला प्रतिसाद देत कर्वेनगर येथील राजाराम पुलाजवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी स्विकृत नगरसेविका अँड् सौ मीताली कुलदीप सावळेकर यांनी कार्यक्रमाचे उद्दीष्ट सांगताना सध्याच्या काळात निसर्गाचे ढळलेला समतोल तसेच कोरोना काळात समजलेले ऑक्सिजनचे महत्त्व, शुध्द हवेचा तुटवडा, या व अश्या अनेक कारणासाठी झाडे लावणे व त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्या निमित्ताने निसर्गाचे संवर्धन तर होईलचं सोबत वृक्षरूपाने प्रियजन चिरंतन स्मृतीत राहतील व पुढील पीढीपुढे एक चांगला आदर्श ठेवता येईल.

Img 20210522 wa0207

यावेळी उपस्थितांपैकी विद्याताई साताळकर यांनी उपक्रमात सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त करत असताना “आपण आपल्या प्रियजनांच्या अस्थिंची राख जर आपल्याचं घरातील झाडांभोवती टाकली तर आपल्याला नात्याची उब जाणवत राहील” असे मत व्यक्त केले.

तसेच संगिता शेवडे यांनी आवाहन केले की जर कोणाकडे रोपे असतील आणि त्यांना ती द्यायची असतील तर या उपक्रमाद्वारे ती योग्य ठिकाणी लावली जातील” असे सांगितले.
लगेचच खाडीलकर यांनी सीताफळाचे रोप देऊ शकेन असे सांगितले.त्याचबरोबर अनेक सामाजिक कामात योगदान देणा-या गौरी ताम्हणकर यांनी गेल्या तीन वर्षात जेथे जेथे मोठे वृक्ष उन्मळून पडले तेथे तेथे वृक्षारोपण करावे असे सुचविले.

2015 साली माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर दरवर्षी आखिल भारतीय ब्राह्मण महासंघ अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये सातत्याने सहभाग घेत असते. आजही अंकूरच्या उपक्रमात सहभागी होताना आनंद होत आहे व सदर झाडांची काळजी घेण्याची हमी देखील मी घेत आहे. अशी ग्वाही अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लक्ष्मीकांत धडफळे यांनी दिली.

अंकूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुलदीप सावळेकर यांनी अशाप्रकारच्या उपक्रमातून वडिलांचा सामाजिक वारसा या निमित्ताने पुढे  चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
हा उपक्रम १५ ऑगस्टपर्यंत चालणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन विठ्ठल मानकर यांनी केले.

यावेळी विद्या साताळकर, सरोज जोशी, राधाकिशन वर्मा, सौ व श्री लक्ष्मीकांत धडफळे, सौ व श्री मिलींद खरे, देवयानी खाडीलकर, देविका बापट, अर्जून मल्हारे, श्री धडफळे, संगिता शेवडे, गौरी ताम्हणकर, श्री संख्ये, श्री ताम्हाणे, रूपाली मगर, विठ्ठल मानकर, प्रदीप जोशी, रमेश चव्हाण उपस्थित होते.

कुलदीप सावळेकर यांनी सुत्रसंचालन केले व युवा नेते नेहल शहा यांनी वृक्षारोपणासाठी सहाय्य झालेल्या टीम सह, वारजे कर्वेनगरचे सहाय्यक आयुक्त संतोष वारूळे तसेच उद्यान विभागा सहीत उपस्थित सर्वांचे आभार मानले.तसेच आवाहनाला प्रतिसाद देत अनेक नागरिकांनी त्यांच्या त्यांच्या घरी वृक्षारोपण केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये