कोथरुड पोलीस स्टेशनमधील भैरवनाथ शेळकेंसह ११ जणांचा शौर्य पुरस्कार देऊन होणार सन्मान…

कोथरुड : pune city कोथरुड पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके यांच्यासह ११ पोलीस अधिकाऱ्यांचा १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनादिवशी शौर्य पुरस्कार देऊन कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे.
कोथरुड पोलीस स्टेशनचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना या बारा पोलीस अधिकाऱ्यांनी शिवतीर्थ नगर येथे शस्त्रास्त्रांसह दरोड्याच्या तयारीत असलेल्या शिखलदरी टोळीला जायबंद करत मोठी धाडसी कारवाई केली होती.
पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके यांच्यासह नंदकिशोर सांगुर्डे, दत्ता चव्हाण, मनोहर कुंभार, वैभव शिंदे, स्वप्निल गायकवाड, सुरज सपकाळ, होनाजी धादवड, विकास मरगळे, भुजंग गजभारे, तानाजी बूरले, विशाल घारे या पोलीस अधिकाऱ्यांचा शौर्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.




