कोथरुड

कोथरूड मनसे आयोजित ऑनलाईन मेहंदी व नऊवारी साडी स्पर्धेचा पारितोषिक वितरण संपन्न ; यांनी मिळवला प्रथम क्रमांक…

कोथरुड : pune city, kothrud महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ओम चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड परिसरातील महिलांसाठी  आयोजित केलेल्या ऑनलाइन मेहंदी स्पर्धेत अंकिता मोरे यांनी व नऊवारी साडी स्पर्धेत अपेक्षा काकड यांनी प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेमध्ये सुमारे १४४ महिलांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन मनसे सरचिटणीस ॲड.किशोर शिंदे यांच्यासमवेत संजय काळे, गणेश शिंदे, श्रीकांत अमराळे, शशांक अमराळे यांनी केले होते. पारितोषिक वितरण समारंभास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्षाचे पुणे शहर अध्यक्ष नरेंद्र तांबोळी, शहर उपाध्यक्ष प्रशांत कनोजिया, उपविभाग अध्यक्ष प्रशांत पायगुडे, साधू धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेचे परीक्षण सुप्रिया काळे, स्नेहल शिंदे, वृषाली धुमाळ यांनी केले. मेहंदी स्पर्धेमध्ये अंकिता मोरे यांना प्रथम, प्रांजली भिकुले यांना द्वितीय, तर अक्षता माझिरे यांना तृतीय क्रमांक मिळाला तर नऊवारी स्पर्धेमध्ये अपेक्षा काकड यांना प्रथम,अक्षता सावंत द्वितीय तर श्रुती राजपुरे यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

Paperdesign 2

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये