सेवा आणि समर्पणाचा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचा आदर्श सर्वांनीच घ्यावा – मुरलीधर मोहोळ.

कोथरूड : pune city, Kothrud सेवा आणि समर्पणाचा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचा आदर्श सर्वांनीच घ्यावा आणि केंद्र सरकार ने सुरु केलेल्या योजना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवाव्या असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. Everyone should follow the example of Prime Minister Narendra Bhai Modi of service and dedication – Muralidhar Mohol.
नरेंद्रभाई मोदी यांच्या एकहात्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिक्षण समिती अध्यक्ष, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,कै. म. ग आचवल ट्रस्ट, क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि नयनतारा आय क्लिनिक च्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी,नेत्रचिकित्सा व काचबिंदू, तिरळेपणा आणि मोतीबिंदू वरील मोफत शास्त्रक्रिया शिबीर प्रसंगी ते बोलत होते.
नरेंद्रभाई मोदी यांच्या अभूतपूर्व नेतृत्वाची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली असून हिंदुस्थानाला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो असेही मोहोळ म्हणाले.
एरंडवण्यातील गणेशनगर ओटा वसाहत येथे आयोजित कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या शिकवणीनुसार देश प्रथम, मग पक्ष आणि शेवटी स्वतः ( Nation First, Party Next,Self Last ) यावर चालण्याचा मी प्रयत्न करत आहे असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. मी हे वर्षे सेवा वर्ष म्हणून समर्पित करण्याचे ठरविले असून कोरोनाच्या संकटकाळात आरोग्यसंपन्नतेचे महत्व खूप वाढले आहे, त्यामुळे आजपासून वर्षभर वस्ती विभागात व उपेक्षित घटकांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा पोहोचविण्याचा निर्धार केला असल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.

यावेळी भाजप सरचिटणीस नगरसेवक दीपक पोटे,भाजप प्रवक्ते व क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,नगरसेवक जयंत भावे,स्वीकृत सदस्य ऍड. मिताली सावळेकर, प्रभागाचे सरचिटणीस निलेश गरुडकर, ऍड. प्राची बगाटे, महिला मोर्चाच्या कोथरूड मंडल सरचिटणीस केतकी कुलकर्णी, आय टी सेल शहर च्या संयोजिका कल्याणी खर्डेकर, अपर्णा गरुडकर, जयश्री घाटे, किरण देखणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते डॉ. अनिल परांजपे, डॉ. मेधा पtरांजपे व ट्रस्ट च्या विश्वस्त सौ.विशाखा वेलणकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास राजबाग तरुण मंडळ,निवांत मित्र मंडळ, देशप्रेमी मित्र मंडळ,धर्मवीर संभाजी मित्रमंडळ व नवनाथ मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभले. संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन, एड.प्राची बगाटे यांनी स्वागत तर निलेश गरुडकर यांनी आभार प्रदर्शन केले.



