पुणे शहर

किरण दगडे पाटील यांनी निवडणूकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली – रावसाहेब दानवे पाटील

पुणे : लोक निवडणूकीत निवडून येण्यासाठी भरपुर आश्वासने देतात. मात्र ती पुर्ण करीत नाहीत. असा अनुभव मला अनेक वेळा आला. पण नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी निवडणुकीवेळी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. सातत्याने पाच वर्षे कार्यरत आहेत. याचा आनंद वाटतो. अशा शब्दात केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी कौतुकाची थाप दिली.

बावधन भुसारी कॉलनी परिसरातील नागरिकांसाठी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी सरंजाम वाटप दानवे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी स्थानिक आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक किरण दगडे पाटील, नगरसेविका अल्पना वरपे, पियुषा किरण दगडे पाटील, राजाभाऊ जोरी, बाळा टेमकर आदी उपस्थित होते.

Img 20211028 wa0192 1

दानवे पाटील म्हणाले, नगरसेवकाचा, महापौर होतो.आणखी मोठी पदे मिळतात. मात्र आपण ज्या भागाचे नेतृत्व करीत असतो. तेथील नागरिकांचे प्रेम मिळाले नाही तर उपयोग नाही. दगडे पाटील यांनी लोकांची कामे करीत लोकांचे प्रेम मिळवले आहे. त्यांनी आणखी चांगली कामे करावीत म्हणून लोकांनी त्यांना नगरसेवक म्हणून पुन्हा संधी द्यावी.

किरण दगडे पाटील म्हणाले, केवळ निवडणुका जवळ आल्या म्हणून मी दिवाळी सरंजाम वाटप करतो असे नाही. मी गेली पाच- सहा वर्षे सलग हा कार्यक्रम राबवित आहे. आत्ता काही लोक निवडणूकीच्या तोंडावर वाटपाचा कार्यक्रम राबवित आहेत. ते गेली चार वर्षे कूठे होते ? कोविडच्या महामारी मध्ये कूठे होते? हे सर्व लोकांना माहीत आहे.

तीन टप्प्यांमध्ये या दिवाळी सरंजाम चे वाटप करण्यात आले. सुरुवातीला भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वाटप करून शुभारंभ करण्यात आला होता. आज दुपारी माजी मंत्री व भाजप चे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते बावधन मध्ये सरंजाम वाटप करण्यात आले.

Screenshot 2021 10 26 15 21 45 02

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये