कोथरूडमधील बाळासाहेब ठाकरे कलामंदीर- नाट्यगृहाची शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्याकडून पाहणी

शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या प्रयत्नातून कलामंदीर- नाट्यगृहाची उभारणी
पुणे : पुणे महानगरपालिकेचे शिवसेना गटनेते ,नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या प्रयत्नातून कोथरूड येथे शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे कलामंदिर-नाट्यगृह बांधण्यात येत आहे.या नाट्यगृहाच्या कामाची पाहाणी करण्यासाठी शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख,पुणे शहर व जिल्हा सरचिटणीस,भारतीय कामगार सेना सचिन अहिर यांनी भेट दिली.
या भेटीच्या दरम्यान त्यांनी संपूर्ण कामाची पाहणी करून, कामाबाबत समाधान व्यक्त केले व हे नाट्यगृह पुणेकर नाट्य- रसिकांसाठी लवकरात लवकर सुरू करावे असे सांगितले.पुणे शहराचे व शिवसेनाप्रमुखांचे एक विशेष नाते होते. या नात्याच्या अनुषंगाने पुणे व बाळासाहेब यांच्या संबंधांवरील निवडक दहा प्रसंगांचे एक स्मृती-दालन उभारण्याबाबत सुचना दिली,तसेच या स्मृती-दालनामध्ये उभारण्यात येत असलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या अर्धपुतळ्याचीसुद्धा पाहणी केली. व त्याबाबत महत्त्वाच्या सूचना देऊन मार्गदर्शन केले.

या प्रसंगी नगरसेविका पल्लवी जावळे,शहरप्रमुख संजय मोरे,शहरप्रमुख गजानन थरकुडे,शिवसेना विभागप्रमुख भारत सुतार,अधीक्षक अभियंता-भवन विभाग शिवाजी लंके, उपअभियंता उपेंद्र वैद्य,सहाय्यक अभियंता विलास मोराळे, कार्यकारी अभियंता विद्युत योगेश माळी,अभियंता विद्युत विभाग राजेंद्र गोसावी,आर्किटेक शिरीष केंभवी,शिल्पकार स्वप्निल परदेशी,शिल्पकार संजय परदेशी हे उपस्थित होते.



