वडगाव शेरी येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या शाखेचे उद्घाटन..

पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ वडगाव शेरी शाखेचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ गोविंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत श्री गजानन महाराज मंदिरात करण्यात आले. यावेळी पुरुष आघाडी व महिला आघाडी मिळून 32 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी बोलताना गोविंद कुलकर्णी यांनी ब्राह्मण्य ,सामाजिक समरसता, शैक्षणिक योजना, आर्थिक सक्षमीकरण, राजकारणातील ब्राह्मणांचा सहभाग या मुद्द्यावर भाष्य केले. याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित असणारे नगरसेवक योगेश मुळीक व ज्ञानेश्वर शिंदे यांनी या भागात पहिल्यांदा स्थापन झालेल्या महासंघाच्या शाखेला शुभेच्छा दिल्या व संपूर्ण पुणे जिल्ह्यात होत असलेल्या कार्याचा गौरव केला.
यावेळी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मंदार रेडे, जिल्हाध्यक्षा केतकी कुलकर्णी, सरचिटणीस विकास अभ्यंकर, पुरोहित आघाडी अध्यक्ष संतोष वैद्य, शाखेचे अध्यक्ष राजेश सहस्त्रबुद्धे, आयोजनात ज्यांचा मोलाचा सहभाग राहिला त्या शाखा अध्यक्ष (महिला आघाडी) रोहिणी ढोले, अनिता काळे, अनघा सहस्त्रबुद्धे, विलास अवचट तसेच शाखेचे सर्व महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता श्री गजानन महाराजांच्या मंदिरात गुरुजींच्या हस्ते आरती करून करण्यात आली.







