पुणे शहर

विरेश शितोळे यांच्या तक्रारीनंतर वारजे कर्वेनगर परिसरातील सोसायट्यांसमोरील बेवारस वाहने प्रशासनाने हटवली..

कर्वेनगर : वारजे कर्वेनगर परिसरातील रस्त्यांवर तसेच सोसायट्यांचे गेट समोर अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या बेवारस वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होत असून त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

या संदर्भात वारजे कर्वेनगर परिसरातील सोसायट्यांमधील नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्यानंतर राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विरेश शितोळे यांनी महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांना याबाबत माहिती देऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यानंतर चिंतामणी रिव्हर व्हिव, लक्ष्मी नारायण पार्क व गोल्डन पेटल्स येथील रस्त्याच्या कडेची बेवारस वाहने प्रशासनाकडून हलवण्यात आली आहेत.

Img 20220113 125014

विरेश शितोळे म्हणाले, वारजे कर्वेनगर परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेने बेवारस वाहने उभी असल्याने नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण होत आहे. संबंधित वाहने कोणाची आहेत, ती एकाच ठिकाणी अनेक दिवसांपासून का उभी आहेत, त्यांचा गैर कामांसाठी वापर झाला असेल का असे अनेक सवाल नागरिकांच्या मनामध्ये येत आहेत, त्यामळे वाहतूक पोलीस व पालिका प्रशासनाने अशा बेवारस वाहनांच्या मालकांचा प्रादेशिक परिवहन विभागातून पत्ता शोधून या वाहानांबाबत योग्य ती शहानिशा करून कारवाई करावी.

Screenshot 20211227 1402344603556305344739789
Whatsapp image 2022 01 05 at 1. 18. 18 pm

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये