पुणे शहर
कोथरूड- पौड फाटा वेताळ टेकडीवरील खाणीतील पाण्यात पडला युवक; अग्निशमन दलाने वाचविले प्राण

पुणे : कोथरूडमधील पौड फाटा, वेताळटेकडी येथे सकाळी सात वाजता पाण्याच्या खाणीमधे एक युवक वर मांजरीला वाचविताना वरुन खाली पाण्यात पडला होता. अग्निशमन दलाकडून जवानांनी रश्शी व तराफाचा वापर करीत युवकाला जखमी अवस्थेत बाहेर काढून उपचाराकरिता रुग्णालयात रवाना केले.
या कामगिरीत अग्निशमन अधिकारी राजेश जगताप, चालक – अमोल शिंदे, विजय शिंदे, तांडेल – सचिन आयवळे, राजेश कुलकर्णी व जवान सचिन वाघोले, शैलेश दवणे, जितेंद्र कुंभार, प्रविण रहाटे, पंढरीनाथ उभे, संजय भावेकर, प्रकाशदाजी कांबळे, शुभम गोल्हार, हेमंत कांबळे यांनी सहभाग घेतला.










