कोथरुड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाने वर्षभरात वसूल केला एवढा मोठा दंड..

कोथरूड : कोथरूड – बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाने गेल्या वर्षभरामध्ये कोथरुड बावधन परिसरात विविध ठिकाणी केलेल्या करावयांमध्ये १२ लाख ६६ हजार ५५० रुपये एवढा मोठा दंड नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून वसूल केला आहे.
कोथरुड बावधन परिसरात अस्वच्छता पसरवणे, रस्त्यावर थुंकणे, बंदी असतानाही प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे, कोविड नियमांचे पालन न करणे, वाहतुकीचे व स्वच्छतेचे नियम मोडणे, रस्त्यावर कचरा फेकणे, नदीपात्रात निर्माल्य टाकणाऱ्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करून हा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती कोथरूड – बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनावणे यांनी दिली.
करण्यात आलेल्या कारवायांमध्ये गेल्या वर्षभरात तब्बल १२,६६,५५० रुपये एवढा दंड नागरिकांकडून वसूल कारण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याला 2 ते 3 हजार व्यक्तींवर ही कारवाई करण्यात आली आहे . प्लास्टिक वापरण्यासाठी ५००० – २५०००, मास्क न वापरणे ५०० , वाहतुकीचे नियम न पाळल्यास १०००, नो पार्किंगला २००, अस्वच्छतेसाठी १००० हे त्यातील प्रमुख दंड आहेत.
स्वच्छ्तेसाठी व कचऱ्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी सातत्याने कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या वतीने कार्यक्रम घेतले जात असतात. परंतु तरीही काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते, असे सोनावणे यांनी सांगितले.
प्रत्येक महिन्यात वसूल करण्यात आलेला दंड
जानेवारी ६७,६९० मार्च २,६५,९७०, मे १,९१,७५०
जून २,३३,७००, जुलै १,६८,०५०,ऑगस्ट. १,६२,७२०
सप्टेंबर ६५,९३०, ऑक्टोबर ८३४०, नोव्हेंबर २०,६००
डिसेंबर. ८१,८००
माहेश्वरी कामठे
वैष्णवी बोरसे (टीम सिंहासन NEWS)




