कोथरुडपुणे शहर

आयडीयल सोसायटीमध्ये ” संकल्प- सूर्य नमस्काराचा”.

कोथरुड: आयडीयल सोसायटी आणि योग आनंद संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रथसप्तमी निमित्त "संकल्प - सूर्य नमस्काराचा" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

”संकल्प- सूर्य नमस्काराचा” हा उपक्रम आयडीयल सोसायटी आणि योग आनंद संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रथसप्तमी निमित्ताने आयोजन केला होता. यंदाचे हे ६ वे वर्ष आहे. यानिमित्त योग शिक्षिका नयना गांधी आणि विनय गांधी यांनी सूर्य नमस्कार शास्त्र शुध्द पद्धतीने कसे घालावे याचे मार्गदर्शन केले व उपस्थितांकडून त्याचा सरावही करुन घेतला.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

प्रमुख पाहुणे छत्रपती पुरस्कार विजेते सुमंत वाईकर यांनी योग, सूर्य नमस्कार, गायत्री मंत्र यांचे जीवनातील महत्त्व विषद करून, उपस्थित युवा पिढीला खेळांचे महत्त्व तसेच सरकारकडून याबाबत मिळणारे प्रोत्साहन, विविध पुरस्कार, सोई सवलती याची माहिती देवुन सातत्य ठेवण्याचे आवाहन केले. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार वढावकर यांनी सोसायटीच्या विविध उपक्रमांची माहिती देवुन सूर्य नमस्काराचा समाजामध्ये प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन केले.


विनय गांधी यांनी योग आनंद संस्थेची माहिती दिली. याप्रसंगी सोसायटीचे सचिव शैलेश बुरसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. रविंद्र गांधी यांनी आभार मानले.कार्यक्रमाला विठ्ठल गुरव, दयानंद जवळकर, मकरंद केतकर, वैजयंती केतकर, हेमंत गांधी गुगळे गौरी, शीतल सावंत, मधू मिलिंद मेहेंदळे सुरेखा गांधी यांच्यासह अनेक नागरिकांनी यात भाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये