Facebook आणि Instagram भारतात होणार का बंद?

ऑक्टोबर मध्ये फेसबूक facebook कंपनीचे नाव बदलून मेटा ठेवण्यात आले. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे की जगाला त्यांची कंपनी फेसबुक ही सोशल मीडिया कंपनी म्हणून नव्हे तर मेटाव्हर्स म्हणून ओळखली जावी.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फेसबुकचे Facebook नाव बदलण्यात आले, त्यानंतर ही कंपनी आता मेटा Meta म्हणून ओळखली जात आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे की जगाला त्यांची कंपनी फेसबुक ही सोशल मीडिया कंपनी म्हणून नव्हे तर मेटाव्हर्स म्हणून ओळखली जावी. मेटाने एका निवेदनात म्हटले आहे की जर युरोपियन युजर्सचा डेटा इतर देशांसोबत शेअर करण्याची परवानगी मिळाली नाही तर त्यांना त्यांची सेवा बंद करावी लागेल. मेटाने म्हटले आहे की युजर्सचा डेटा शेअर न केल्यामुळे त्यांच्या सेवांवर परिणाम होत आहे. युजर्स डेटाच्या आधारे कंपनी वापरकर्त्यांना जाहिराती दाखवते.

आत्तापर्यंत मेटा ही कंपनी अमेरिकन सर्व्हरवर युरोपातील युजर्सचा डेटा साठवून ठेवत होती. परंतु जर डेटा ट्रान्सफर सुविधा उपलब्ध नसेल तर फेसबुक, इन्स्टाग्रामसह अनेक सेवा बंद कराव्या लागतील.
युरोपियन युनियन कायद्यानुसार, युजर्स डेटा अमेरिकेत असू नये, तर META कंपनी युजर्सचा डेटा शेअर करण्याची परवानगी मागत आहे. झुकेरबर्गला युरोपमधील युजर्सचा डेटा अमेरिकन सर्व्हरवरही साठवून ठेवायचा आहे.यापूर्वी, प्रायव्हसी शील्ड कायद्यांतर्गत युरोपियन डेटा यूएस सर्व्हरवर हस्तांतरित केला जात होता, परंतु जुलै 2020 मध्ये युरोपियन न्यायालयाने हा कायदा रद्द केला होता. प्रायव्हसी शील्ड व्यतिरिक्त, मेटा यूएस सर्व्हरवर युरोपियन युजर्सचा डेटा स्टोर करण्यासाठी Standard Contractual Clauses कराराच्या कलमांचा देखील वापर करत आहे.
मेटाकडून केवळ युरोपातील फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद करण्याविषयीचं विधान समोर आलं आहे. त्यामुळे जरी डेटा शेअरींग प्रकरणावरुन कंपनी आणि तिथल्या प्रशासनाचं बिनसलं तरी फेसबुक आणि इन्स्टाग्राम केवळ युरोपात बंद होऊ शकतं. कंपनीच्या भारतातील सेवेवर त्याचा काही परिणाम होणार नाही. मात्र भारतीय युजर्सच्या डेटाचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो आणि कंपनीला त्यावर उत्तर द्यावं लागेल.



