Bacchu Kadu : राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

मुंबई : राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu)यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. विधानसभा निवडणुकीत 2014 मध्ये प्रतिज्ञापत्र सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.

विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र सादर केलं. यात त्यांनी त्यांच्या मुंबईतील फ्लॅटची कोणतीही माहिती दिली नव्हती. याविरोधात अमरावतीतील अचलपूरचे भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली. या खटल्यात चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने निकाल दिला आहे. न्यायालयाने बच्चू कडू यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठवला. तसेच दोन महिने सक्षम कारावासाची शिक्षा दिली आहे.



