महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या कार्यक्रमात स्टेज कोसळला

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात (Goregaon Mumbai) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirnman Sena) कार्यक्रमात स्टेज कोसळल्याची घटना घडली आहे.

Img 20220219 wa00011506546445059939271

मनसेच्या शाखेचं उद्घाटन करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे येणार असल्याने स्टेज बांधण्यात आला होता. मात्र, हाच स्टेज कोसळला आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाहीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा सुरक्षित आहेत.

Img 20220217 wa0003

कार्यक्रमासाठी जो स्टेज बांधण्यात आला होता त्याची क्षमता कमी होती. क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्ते स्टेजवर आले आणि त्यामुळे हा स्टेज कोसळला असल्याचं बोललं जात आहे. स्टेज कोसळल्याने एकच गोंधळ उडाला होता. स्टेजचा मधला भाग अचानक खचल्याने त्यात काही महिला पडल्या. मनसे कार्यकर्त्यांनी तातडीने या महिलांना बाहेर काढलं. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. राज ठाकरे हे स्टेजवर होते त्यांना सुरक्षारक्षकांना सावरलं आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी स्टेजच्या पुढे जाऊन कार्यक्रम सुरू ठेवला. 

स्टेज कोसळल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच काळजी घेण्याचा सल्लाही दिला. त्यानंतर राज ठाकरेंनी भाषण सुद्धा केलं. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये