कोथरुडपुणे शहर

राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड मतदारसंघ अध्यक्षपदी गिरीश गुरुनानी यांची निवड

पुणे : कोथरूड युवक राष्ट्रवादी अध्यक्षपदी आज स्थानिक युवा नेते गिरीश गुरूनानी यांची निवड एकमताने करण्यात आली.एका सामान्य व अराजकीय घरातील कार्यकर्त्याच्या असामान्य सामाजिक आणि राजकीय कार्याची दाखल घेत कोथरूड मधील राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी अध्यक्षपदा साठी गुरूनानी यांच्या नावाला समर्थन दर्शविले. पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, कोथरूड राष्ट्रवादी अध्यक्ष हर्षवर्धन मानकर व शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे यांनी गुरूनानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केली.


कोथरूड भागात गुरूनानींचा अनेक आंदोलनात सहभाग होता. इंधन दरवाढ व पुणे महानगर पालिकेच्या अनियमित कारभारविरोधात केलेल्या अनोख्या आंदोलनाने त्यांना युवकांची पसंती मिळवून दिली. तसेच अंधशाळा व एड्स ग्रस्त मुलांसाठी करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल पक्षाने घेतली आहे.
पद मिळाल्यानंतर युवांचे प्रश्न आणखीन प्रखरतेने समाजासमोर मांडून अत्यंत जबाबदार पणे त्यावर तोडगा काढण्याचे कार्य करणार असल्याचे गुरूनानी यांनी यावेळी माध्यमांशी बोलत असताना सांगितले.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये